२२ पैकी १३ राज्यांत मुलांची वाढ खुंटण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन ते पाच वयोगटातील एक तृतीयांश मुलाची उंची वयानुसार खूपच कमी असल्याचे आढळून आले आहे!

‘अवर नॉनव्हेजिटेरियन काऊ’ या कथेत महाश्वेतादेवींनी धमाल उडवून दिली आहे. न्यदोश नावाच्या या गाईला तळलेले मासे आणि दारूची चटक लागते आणि ती मोकाट सुटते. नशिबाने भारतातल्या सर्व गायी असा गोंधळ घालत नाहीत. पण भारत हा एकमेव देश आहे, जिथे गाईच्या दुधाला शाकाहारी मानले जाते आणि अंड्याला मात्र मांसाहार समजले जाते. याची मोठी किंमत मुलांना मोजावी लागत आहे - कुपोषणाची आणि शारिरीक तसेच बौद्धिक वाढ खुंटण्याची.......